

Pune Rain
पुणे - गेल्या तीन-चार दिवसांपासून सुरू असलेल्या हलक्या पावसानंतर मंगळवारी (ता. २१) शहरात पावसाने दमदार हजेरी लावली. दुपारनंतर वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील अनेक रस्ते जलमय झाले, तर प्रमुख चौक आणि रस्त्यांवर वाहतूक कोंडी झाल्याने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. वातावरणात गारवा निर्माण झाला असला, तरी पाणी साचणे, वाहतूक विस्कळीत होणे आणि काही भागांत वीजपुरवठा खंडित होण्याच्या घटनांमुळे नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला.