Rain : विसर्जन मिरवणुकीला वरुणराजाची हजेरी; पुण्यासह मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता

गणरायाच्या विसर्जन मिरवणुकीमध्ये वरुणराजा स्वतः जातीने हजर राहण्याची शक्यता असून, काही ठिकाणी तो रौद्र रूपही धारण करू शकतो.
rain
rainesakal

पुणे - गणरायाच्या विसर्जन मिरवणुकीमध्ये वरुणराजा स्वतः जातीने हजर राहण्याची शक्यता असून, काही ठिकाणी तो रौद्र रूपही धारण करू शकतो. मागील चार दिवसांपासून सक्रिय झालेल्या मॉन्सूनमुळे यंदा विसर्जन मिरवणुकीतही जोरदार पावसाचे सावट कायम असणार आहे.

गणेशोत्सवाच्या अगदी पहिल्या दिवसापासून पावसाने हजेरी लावली आहे. उत्तरोत्तर त्याच्या तीव्रतेतही वाढ झाल्याचे पाहायला मिळाली आहे. सक्रिय झालेल्या मॉन्सूनमुळे विसर्जन मिरवणुकीतही पावसाचा जोर पाहायला मिळणार आहे.

नैऋत्य मोसमी वाऱ्यांचा (मॉन्सून) परतीचा प्रवास सुरू असतानाच शहरासह जिल्ह्यातच अनेक ठिकाणी जोरदार पावसाने हजेरी लावली होती. शहरात बुधवारी दिवसभरात पिंपरी चिंचवड भागात सर्वाधिक ३१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. पुढील दोन दिवस आकाश सामान्यतः ढगाळ आणि दुपारनंतर मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

शुक्रवार (ता. २९) पर्यंत उत्तर अंदमान समुद्रात चक्राकार वाऱ्यांची स्थिती तयार होण्याची शक्यता आहे. शनिवार (ता. ३०)पर्यंत या भागात कमी दाब क्षेत्राची निर्मिती होण्याचे संकेत आहेत. दक्षिण छत्तीसगड आणि परिसरावर चक्राकार वारे वाहत असून, या प्रणालीपासून उत्तर कर्नाटक किनाऱ्यापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. तसेच उत्तर अंतर्गत कर्नाटकमध्ये, तसेच तमिळनाडूच्या किनाऱ्यालगत चक्राकार वाऱ्यांच्या स्थिती आहेत.

राज्याचे हवामान -

गुरुवारी (ता. २८) दक्षिण कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांत जोरदार पावसाचा इशारा (ऑरेंज अलर्ट) देण्यात आला आहे. तर कोकणातील ठाणे, रायगड, मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यांत जोरदार पावसाचा इशारा (येलो अलर्ट) आहे. विदर्भासह, उर्वरित कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com