esakal | पावसाने जिल्ह्यात एका रात्रीत होत्याचं नव्हतं झाले
sakal

बोलून बातमी शोधा

pune-district-rain

शिवारातल्या पावसाने शेतकऱ्यांच्या डोळ्यातून पाणी वाहू लागलं. आता पाहणी होणार, नेते, अधिकारी येणार, पंचनामे होणार, अहवाल जाणार आणि मग नुकसानभरपाईची वाट बघायचं, पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या नशिबी आलं आहे.

पावसाने जिल्ह्यात एका रात्रीत होत्याचं नव्हतं झाले

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे - ‘‘पीक चांगलं आलं आहे. यंदा पाणी टंचाई जाणवली नाही. वरुणराजानं आमच्यावर कृपाच केली. आता चांगला भाव मिळाला की घेतलेलं कर्ज फेडायचं व संसारात रंगवलेली स्वप्नं साकार करायला मोकळे’’, असं मनाला आनंदाने सांगत खुशीत असलेला बळिराजा परतीच्या पावसाच्या रुद्रावतारामुळे पूर्णपणे उद्‌ध्वस्त झाला. एका रात्रीत होत्याचं नव्हतं झाले. 

सकाळी उठून पाहिलं तर शिवारातील उभी पिके गायब झाली होती. बांध, बंधारे फुटल्याने शेतीतील पिकांची जागा पाण्याने घेतली. काही ठिकाणी डोंगरमाथ्यावरून आलेल्या माती, दगडांनी हिरव्या शेतीची ‘लाल’ शेती झाली. शिवारातल्या पावसाने शेतकऱ्यांच्या डोळ्यातून पाणी वाहू लागलं. आता पाहणी होणार, नेते, अधिकारी येणार, पंचनामे होणार, अहवाल जाणार आणि मग नुकसानभरपाईची वाट बघायचं, पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या नशिबी आलं आहे. दुसऱ्या बाजूला रस्ते, पूल वाहून गेल्याने अनेक गावांचा गावांचा संपर्क तुटला आहे. वीज पुरवठा खंडित झाला आहे. घरात, दुकानात पाणी शिरल्याने अनेकांचे नुकसान झाले आहे. ‘सर आली धावून, मडकं गेलं वाहून’ ही ओळ बालगीतात शोभून दिसते. पण इथे मात्र सरीवर सरी येऊन सगळंच वाहून गेलं आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

खानवटे ओढ्यात चौघे गेले वाहून! 
दौंड : दौंड तालुक्यातील राजेगाव- खानवटे या रस्त्यावरील ओढ्याच्या पाण्यात वाहून गेल्याने एका दांपत्यासह एकूण तीन जणांचा मृत्यू झाला आहे. तर, एक जण बेपत्ता आहे. 

शहाजी गंगाधर लोखंडे (वय ५२), अप्पासाहेब हरिश्चंद्र धायतोंडे (वय ५५) व कलावती अप्पासाहेब धायतोंडे (वय ४८, सर्व रा. खानवटे, ता. दौंड) अशी मृतांची नावे आहेत. तर, सुभाष नारायण लोंढे (वय ४८, रा. खानवटे) हे बेपत्ता असून, त्यांचा शोध सुरू आहे. दौंड तालुक्यास सलग सहा दिवस विजेच्या कडकडाटांसह मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

बुधवारी (ता. १४) रात्री अप्पासाहेब धायतोंडे व सुभाष लोंढे यांच्या दोन दुचाकींवरून चार जण राजेगाववरून खानवटे गावाकडे निघाले होते. सततच्या पावसामुळे रस्त्यात तुकाई मंदिराजवळील ओढ्याला पूर आल्याने पाण्याची पातळी वाढली होती. रात्री ओढ्याच्या वाढलेल्या पाण्याचा अंदाज न आल्याने त्यांनी दुचाकी वाहने त्या प्रवाहात घातली, परंतु चौघे जण दुचाकींसह पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले. आज (ता. १५) सकाळी स्थानिक ग्रामस्थांनी ओढ्याच्या प्रवाहात शोध घेतला.

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

loading image