
खडकवासला : संततधार पावसामुळे खडकवासला धरण परिसरात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक होत आहे. या पार्श्वभूमीवर धरणातून दुपारी एक वाजता सुमारे २००० क्युसेकने मुठा नदीत पाणी विसर्ग करण्याची शक्यता असे मध्यवर्ती पुर नियंत्रण कक्षाच्या सनियंत्रण अधिकारी श्वेता कुऱ्हाडे यांनी गुरुवारी दुपारी पाऊणे बारा वाजता प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात ही माहिती देण्यात आली आहे.