Pune Rains : पुण्यात पुन्हा मुसळधार पाऊस; वाचा सध्याची परिस्थिती

टीम ई-सकाळ
शुक्रवार, 4 ऑक्टोबर 2019

गेल्या दोन-तीन दिवसांपासून पुणेकर उकाड्याने चांगलेच त्रस्त झाले आहेत. त्यानंतर आता पुण्यातील विविध भागात मुसळधार पाऊस बरसत आहे.

पुणे : गेल्या दोन-तीन दिवसांपासून पुणेकर उकाड्याने चांगलेच त्रस्त झाले आहेत. त्यानंतर आता पुण्यातील विविध भागात मुसळधार पाऊस बरसत आहे. त्यामुळे थोडा दिलासा मिळाला आहे. पुण्यातील वाघोली, औंध, सहकारनगर, धनकवडीसह विविध भागात मुसळधार पाऊस बरसत आहे. 

पुण्यातील पावसाची सद्यपरिस्थिती 

- सहकारनगर, पर्वती, स्वारगेट परिसरात मुसळधार पाऊस सुरू

- मुळारोड. वाकडेवाडीत मेघगर्जनेसह वादळीनारा अंधारुन आले.

- दहा मिनिटे जोरदार पाऊस झाला आणि जयभवानी नगर रस्त्यावर जणू नदी वाहू लागली.

- खडकी, बोपोडी, मुळा रोड, वाकडेवाडी रेंजहिल, औंध रोड आदी परिसरात मुसळधार पाऊस सुरू.

- सर्वत्र रस्त्यावर पाण्याचे पाट वाहू लागले रस्त्यावरील सखल भागात पाणी मोठ्या प्रमाणात जमा झाले.

- मुळा रोड येथील वसाहतींमध्ये पावसाचे पाणी जमा होत आहे.

- धनकवडी, कात्रजमध्येही जोरदार पाऊस

- औंधमध्ये ढगांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस सुरु

- घोरपडी परिसरात जोरदार पाऊस

- मुंढवा, केशवनगर, खराडी भागामध्ये पावसाला जोरदार सुरवात

- कोथरूडमध्ये जोरात पाऊस सुरू


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Heavy Rain in Various Area of Pune