पुणेकरांनो, घरी लवकर परता कारण...

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 3 ऑक्टोबर 2019

पुणे : पुणेकरांना, लवकर घरी जा. कारण, शहरात ढग दाटून आले आहेत. ढगांचा गडगडाट आणि विजांचा कडकडाट होऊ लागला आहे. पावसाच्या सरी कोळण्याची शक्‍यता वाटू लागली. तसा अंदाजही भारतीय हवामान खात्याने दिला आहे. 

पुणे : पुणेकरांना, लवकर घरी जा. कारण, शहरात ढग दाटून आले आहेत. ढगांचा गडगडाट आणि विजांचा कडकडाट होऊ लागला आहे. पावसाच्या सरी कोळण्याची शक्‍यता वाटू लागली. तसा अंदाजही भारतीय हवामान खात्याने दिला आहे. 

शहरात सकाळपासून प्रचंड गरम होत होते. उन्हाचा चटकाही वाढला होता. दुपारनंतर हवामानात वेगाने बदल झाले. आकाशात ढगांची गर्दी झाली. तळपणाऱ्या सूर्याच्या किरणांची प्रखरता कमी होत असल्याचे जाणवले. त्याच वेळी काळ्या कुट्ट ढगांनी शहरातील आकाश व्यापण्यास सुरवात केली. ढगांचा गडगडाट ऐकू येवू लागला. वाऱ्याचा वेग वाढला. त्यामुळे शहरात मुसळधार पाऊस पडेल, असे वातावरण निर्माण झाले आहे.

दुपारच्या सत्रात शाळेतून घरी जाणारी मुले असो की, कार्यालयातून परतणारे कर्मचारी यांनी लवकर घरी जावे, असे आवाहन करण्यात आले आहे. 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Heavy RainFall can be in pune today