हिंजवडी : हिंजवडी फेज तीनवरून फेज दोनकडे जाणारा मुख्य रस्ता शुक्रवारी (ता. १३) सायंकाळी झालेल्या जोरदार पावसामुळे संपूर्णपणे पाण्यात गेला. सुमारे दोन फूट पाणी साचल्याने त्यामधून वाट काढताना अनेक दुचाकी, चारचाकी वाहने बंद पडली. .त्याने सुमारे दोन किलोमीटरपर्यंत रांगा लागून तीन तास वाहतूक कोंडी झाली. दरम्यान, अतिशय जोरदार पाऊस झाल्याने ही परिस्थिती उद्भवल्याचा दावा ‘पीएमआरडीए’ने केला आहे. अभियंत्यांना आला होता. याबाबत सोशल मीडियावर व प्रसार माध्यमातून प्रशासकीय यंत्रणांचे वाभाडे काढण्यात आले. .त्यानंतर एमआयडीसी आणि पीएमआरडीए प्रशासनाकडून अनेक ठिकाणी पाण्याला वाट काढण्यासाठी तात्पुरत्या उपाययोजना करण्यात आल्या. मात्र, त्याचाही या पावसात फारसा उपयोग होऊ शकला नाही. एखाद्या मोठ्या पावसामुळे आयटीची चक्क जलकोंडी होत असेल; तर संपूर्ण पावसाळा कसा जाणार ? असा संतप्त सवाल या भागातील नागरिक व आयटीयन्स विचारत आहेत. पीएमआरडीए, एमआयडीसी व सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्यात असलेला समन्वयाचा अभाव, नसलेली दूरदृष्टी आयटीतील अनेक समस्यांना जन्म देत आहे..हिंजवडी फेज तीनमध्ये टीसीएस, टेक महिंद्रा, इन्फोसिस, कॉग्निजंट, कॅपजेमिनी अशा आघाडीच्या कंपन्यांसह २५ पेक्षा अधिक बहुराष्ट्रीय कंपन्या कार्यरत आहेत. त्यामुळे या भागातून दररोज लाखो आयटी कर्मचारी कामासाठी ये-जा करतात. विकेंडला दर शुक्रवारी एकाचवेळी शेकडो वाहनांमधून आयटीयन्स आपल्या मूळगावी जाण्यासाठी बाहेर पडतात. हे देखील कोंडीचे एक कारण ठरत आहे..प्रतिकूल परिणामांची भीती हिंजवडी-माणमध्ये २५ वर्षांहून अधिक काळ आयटी पार्क असतानाही प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी कोणतेही ठोस पावले न उचलल्याची टीका होत आहे. आयटी कंपन्या, शेकडो मोठमोठे बांधकाम प्रकल्प, शहरीकरण, भरमसाठ लोकसंख्या त्या तुलनेत येथे पायाभूत सुविधांची वाईट परिस्थिती आहे..वाढत्या गर्दीवर ठोस उपायांची गरज.गेल्या अनेक वर्षांपासून अतिशय गंभीर आणि जटील बनलेली वाहतूक कोंडीची समस्या पाहता आता राज्य सरकारने आयटीकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी जोर धरत आहे. पायाभूत सुविधा, सक्षम जलनिस्सारण, पावसाळी पाण्याचा निचरा करणारी यंत्रणा उभारण्यात देखील सपशेल अपयश आले आहे. समस्यांचे गुऱ्हाळ असेच कायम राहिले; तर भविष्यात येथील आयटी उद्योगांवरही याचा प्रतिकूल परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे..गेल्या आठ दिवसांत पावसाळी पाण्याचा निचरा करणारी यंत्रणा कार्यान्वित करण्यावर आम्ही खूप काम केले आहे. नैसर्गिक ओढे-नाले साफ करून पुनर्जीवित केले. बॅरिकेड्स आणि पदपथ फोडून पाण्याला वाट करून दिली. चेंबर्सची स्वच्छता केली अन्य सर्व उपाय केलेत. शुक्रवारी मध्यरात्री तीन वाजेपर्यंत काम सुरू होते. शुक्रवारी अतिशय जोरदार पाऊस झाल्याने ही परिस्थिती उद्भवली. इथून पुढे तसे होणार नाही.- डॉ. योगेश म्हसे, आयुक्त, पीएमआरडीए.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.