

Heavy rainfall brings relief to farmers in Ambegaon taluka as Manchar records 51mm of rain
Sakal
मंचर : आंबेगाव तालुक्यात रविवारी (ता. २८) सायंकाळनंतर पावसाने जोरदार हजेरी लावली. मंचर शहरासह अवसरी खुर्द, पिंपळगाव, आदर्शगाव, गावडेवाडी, लांडेवाडी, श्रीक्षेत्र वडगाव काशिंबे, एकलहरे, तांबडेमळा आणि सातगाव पठार परिसरात मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.