Ghorpadi Rain : घोरपडीत मुसळधार पावसाचा तडाखा; झाडे कोसळली, रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतूक विस्कळीत

घोरपडी परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे घोरपडीतील विविध भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून नागरिकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागले.
tree break in ghorpadi by rain

tree break in ghorpadi by rain

sakal

Updated on

घोरपडी - परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे घोरपडीतील विविध भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून नागरिकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागले.

बालाजी नगर परिसरात जोरदार वाऱ्यासह पावसामुळे दोन झाडे कोसळली. यामुळे बालाजी नगर हा मुख्य रस्ता काही काळ बंद होता. अनेक ठिकाणी झाडे पडल्यामुळे अग्निशामक दलाच्या गाडीला येण्यास उशीर असल्यामुळे नागरिकांनी ते झाड बाजूला करून रस्ता वाहतुकीसाठी मोकळा केला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com