निरगुडसर - आंबेगाव तालुक्यातील निरगुडसरसह परिसरात शुक्रवार (ता. १६) रोजी दुपारी विजेच्या कडकडाटासह झालेल्या पावसाने चांगलेच झोडपले. पावसामुळे सर्व ओढ्या नाल्यांना पूर आला. तर शेतीपिके पूर्णपणे जलमय झाली, यामध्ये शेती पिकांचे नुकसान झाले, तर शेताचे बांध फुटले, सायंकाळपर्यंत पाऊस सुरूच आहे.