पुणे - अतिवृष्टीचा फटका पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील रस्ते आणि पुलांना बसला आहे. पावसामुळे अनेक ठिकाणी रस्ते वाहून गेले, रस्त्यांचे कडे खचले, तर पुलांचे कठडे आणि संरक्षक भिंती तुटल्या आहेत. .तालुकानिहाय झालेले नुकसानखेडमध्ये ३३.८३ किलोमीटर रस्ते, ३० पूल व मोऱ्यांचे नुकसान झाले आहे. या दुरुस्तीसाठी २३ कोटी रुपयांची मागणी केली आहे.जुन्नरमध्ये १५.४० किलोमीटर रस्ते, २२ पूल व मोऱ्यांचे नुकसान झाले असून, सहा कोटी ३० लाख रुपये आवश्यक आहेत.आंबेगावमध्ये १२.७० किलोमीटर रस्ते, आठ पूल व मोऱ्यांचे नुकसान झाले असून, चार कोटी ८१ लाख रुपयांची गरज आहे.मुळशीत ६५.८० किलोमीटर रस्ते, २२ पूल व मोऱ्यांचे नुकसान. त्यासाठी १७ कोटी ६५ लाखांची मागणी केली आहे.भोरमध्ये १९.६६ किलोमीटर रस्ते आणि तीन पुलांचे नुकसान झाले असून, १० कोटी ७५ लाख रुपये आवश्यक आहेत.राजगडमध्ये ३.७२ किलोमीटर रस्ते, २० पूल व मोऱ्यांचे नुकसान झाले आहे. त्यासाठी तीन कोटी २५ लाख रुपयांची गरज आहे.मावळमध्ये १५ किलोमीटर रस्ते आणि दोन पुलांचे नुकसान झाले असून, अडीच कोटी रुपयांची आवश्यकता आहे..निधी मंजूर झाल्यानंतर खराब झालेले रस्ते, पूल, मोऱ्यांची दुरुस्ती प्राधान्याने करण्यात येणार आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील वाहतूक पूर्ववत होऊन नागरिकांची गैरसोय कमी होण्यास मदत होणार आहे.- दीपाली हुलावळे, सभापती, बांधकाम व आरोग्य.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.