वेल्हे, (पुणे) - राजगड तालुक्यामध्ये गेल्या तीन दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे तालुक्याचे जनजीवन विस्कळीत झाले असून अनेक ठिकाणी नैसर्गिक आपत्तीच्या लहान मोठ्या घटना घडत आहेत या पार्श्वभूमीवर तहसीलदार निवास ढाणे यांनी प्रशासनास सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.