
पिंपरी : शहरात शुक्रवारी (ता. १३) पुन्हा एकदा मुसळधार पावसाचा तडाखा बसला असून, सखल भागांत पाणी साचल्यामुळे जनजीवन विस्कळित झाले. दुपारी चार ते रात्री साडेदहापर्यंत झालेल्या पावसामुळे उपनगरांमधील अनेक भागांत पाणी साचून रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली. वाहतूक कोंडी, चिखलमय रस्ते आणि नाल्यांचे ओसंडून वाहणारे पाणी यामुळे पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांचे प्रचंड हाल झाले. त्यातच महापालिकेने कागदोपत्री दाखविलेल्या शंभर टक्के नालेसफाईचीदेखील चांगलीच पोलखोल झाली.