
पुणे : राज्यात मॉन्सूनचा पाऊस सक्रिय होऊ लागला आहे. उद्या (ता. १६) कोकण, घाटमाथ्यावर पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. पूर्व विदर्भात पाऊस वाढणार असून, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे. रायगड जिल्ह्यात मुसळधारेची शक्यता असल्याने सावधगिरीचा इशारा (रेड अलर्ट), कोकण आणि घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा इशारा (ऑरेंज अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे.