सकाळपासूनच पुणे शहरात पावसाची संततधार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 पुणे शहरात मुसळधार पाऊस

सकाळपासूनच पुणे शहरात पावसाची संततधार

पुणे : एक दिवसाचा विश्रांतीनंतर मंगळवारी (ता.१३) सकाळपासूनच शहरात हलक्या स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावली आहे. आकाश मुख्यतः ढगाळ असून शहर व उपनगरात अनेक ठिकाणी हलक्या सरीना पहाटेपासूनच सुरवात झाली.

सोमवारी दिवसभरात शहरात सहा मिलिमीटर एवढ्या पावसाची नोंद झाली. हीच आकडेवारी रविवारी ५० मिलिमीटर पेक्षा जास्त होती. रविवारी संध्याकाळी पडलेल्या धुवाधार पावसामुळे पुणेकरांनी धास्ती घेतली आहे. कारण अनेक ठिकाणी झाडे पडण्यापासून ते घरात पाणी घुसण्या पर्यंतच्या घटना घडल्या होत्या. अगदी कमी कालावधीत मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे शहरात अनेक ठिकाणी पाणी साचल्याच्या घटना घडल्या.

तसेच रस्त्यांनाही ओढ्यांचे स्वरूप प्राप्त झाली होती. मंगळवार सकाळपासूनच आता पावसाला सुरुवात झाली असून दिवसभर आकाश मुख्यता ढगाळ, अनेक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या जोरदार सरांची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. विशेषता दुपारी सुरू झालेला पाऊस रात्री पर्यंत चालेल असा अंदाजही वर्तवण्यात आला आहे.

त्यामुळे पुणेकरांनी आज कामानिमित्त बाहेर पडताना छत्री रेनकोट आधी गोष्टी जवळपास गरजेचं आहे. तसेच सखल भागात राहणाऱ्या नागरिकांबरोबरच ओढा व नदी काठच्या नागरिकांनी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. पुढील दोन दिवस पावसाची दाट शक्यता असल्याने घाट माथ्यावर फिरण्यासाठी जाणे टाळावे, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

Web Title: Heavy Rains To Continue Continuously Since Morning

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..