tree collapse by hailstorm
sakal
नारायणगाव - नारायणगाव, येडगाव, वारूळवाडी परिसरात आज दुपारी गारपिटीसह मुसळधार वादळी पाऊस झाला. गारांचा तडाखा व वादळामुळे झाडावरील आंबे खाली पडल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. द्राक्षाच्या कोवळ्या वेली जमिनीवर तुटून पडल्या.शेतकऱ्यांचे डाळिंब, आंबा,टोमॅटो, शेतात झाकून ठेवलेला कांदा, उन्हाळी बाजरी सह इतर भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. कोल्हे मळा रस्त्यावर बभाळीचे झाड पडल्याने जुन्नर ओझर कडे जाणारी वाहतूक ठप्प झाली. विज वाहक तारा व विजेचे खांब पडल्याने वीज पुरवठा खंडित झाला.