खडकवासला : उन्हाळी सुट्टी सुरू असताना या रविवारी पावसाळी वातावरण असल्याने सिंहगड खडकवासला परिसरात पर्यटकांची मोठी गर्दी झाली होती. परिणामी डोणजे ते खडकवासला या दरम्यान सुमारे साडेसहा किलोमीटर परिसरात वाहतुकीची कोंडी झाली होती..खडकवासला सिंहगड परिसरात सकाळपासूनच पावसाची रिमझिम सुरू होती. उन्हाळी सुट्टीतील मागील रविवारी कडक ऊन असल्याने पर्यटकांनी या परिसरात आले नव्हते. आज पावसाळी वातावरण झाल्यामुळे पर्यटकांचा मोठा लोंढा या परिसरात दिवसभर येत परिणामी दुपारी दोन वाजताच सिंहगड वरून पुण्याला जाणाऱ्या रस्त्यावर चौपाटीच्या पाठीमागे एक दोन किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. संध्याकाळी पाच वाजल्यानंतर ही रांग डोणजे गावापर्यंत पोचली होती..दुपारी दोन वाजता आम्ही या परिसरातून जाताना वाहतूक कोंडी होती. आम्हाला वाहतूक पोलिस कोठेही वाहतूक नियमन करताना दिसले नाही. पर्यटकांमुळे धरण चौपाटी परिसरात होणाऱ्या वाहतूक कोंडीबाबत त्यांनी ग्रामीण भागातील नागरिकांनी शनिवार-रविवारी आजारी पडू नये. वाहतूक कोंडीचा काळ सुरू झालेला आहे प्रशासनाला वाहतूक कोंडी टाळण्यासाठी नियोजन करता येत नाही खडकवासला धरण चौकात स्थानिक नागरिकच वाहतूक कोंडी सोडवताना दिसले. असे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खडकवासला मतदार संघाचे अध्यक्ष नितीन वाघ यांनी सांगितले.खडकवासला परिसराचा शहर पोलिस आयुक्तालयात समावेश झाल्यानंतरचा हा पहिला पावसाळा आहे. यामुळे पोलिसांना येथील वाहतूक कोंडीचा अंदाज आलेला दिसत नाही. पावसाळ्यात दर शनिवार रविवारी या परिसरात वाहतूक कोंडी होते. कोंडी टाळण्यासाठी वाहतूक पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात यावा. अशी मागणी गोऱ्हे बुद्रुक ग्रामपंचायतचे उपसरपंच सुशांत खिरीड यांनी केली..चार चाकी वाहनाने एक-दीड किलोमीटर अंतर पार करण्यासाठी आज दुपारी मला एक तास लागला. त्यामुळे मी पुन्हा परत फिरून डोणजे मार्गे खेडशिवापूरला जाऊन खडकवासला परिसरात परत आलो. असे भाजपचे पदाधिकारी अनिल मते यांनी सांगितले.सिंहगड रस्ता वाहतूक पोलीस विभागाच्या वतीने संदर्भात माहिती घेण्यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक राजकुमार बरडे यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही..सिंहगडावर १५ हजार पर्यटकसिंहगडावर शनिवार रविवारी या दोन दिवसात पंधरा हजारावरून अधिक पर्यटन गडावर आले होते. त्यांच्याकडून सिंहगड वनसंरक्षण समितीला सुमारे सव्वा लाख रुपयांचे उपद्रव शुल्क जमा झाले आहे. या दोन दिवसात गडावर 2067 दुचाकीवरून सुमारे सव्वा चार तर बाराशे 50 चार चाकी मधून सव्वा सहा हजार पर्यटक गडावर आले होते. तर तेवढ्याच प्रमाणात खाजगी वाहनातून वाहतूक करणाऱ्या वाहनातून देखील सव्वाचार हजार पर्यटक गडावर आले होते. अशाप्रकारे १५ हजाराहून अधिक पर्यटक गडावर आल्याचे दिसत आहे..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.