
धायरी : सिंहगड रस्त्यावरील धायरी फाटा उड्डाण पुलावर कालव्याच्या रस्त्यावरून होणारी अवजड वाहतूक, आरएमसी प्लांटवरून येणारे डंपर यांच्या वाहतुकीमुळे रस्त्यांवर खड्डेच खड्डे पडले आहेत. मोठ्या प्रमाणात रस्त्यांची चाळण झाल्याचे दिसते. या खड्ड्यांत पावसाचे पाणी साचल्याने वाहनचालकांना खड्ड्यांचा अंदाज येत नाही. तसेच, सिमेंट काँक्रिटच्या मिक्सरमधून रस्त्यावर सिमेंट काँक्रिट आणि खडी पसरल्याने संपूर्ण रस्त्यावर चिखल झाला आहे. यामुळे स्थानिक नागरिक, वाहनचालक त्रस्त झाले आहेत.