कात्रज घाटात शिवशाही बस बंद पडली अन्...

महेंद्र शिंदे
रविवार, 9 फेब्रुवारी 2020

रविवारी पहाटे ही बस कात्रज घाटात बंद पडली होती. त्यामुळे या बसच्या बाजूच्या एका लेन मधून पहाटेपासून वाहतूक सुरु होती. त्यामुळे दोन्ही बाजूला वाहतूक कोंडी होत होती, असे स्थानिक नागरीकांनी सांगितले.

खेड-शिवापूर : कात्रज जुन्या घाटात रविवारी पहाटे एक शिवशाही बस बंद पडली होती. मात्र वाहतूक पोलिस आणि एसटी महामंडळ यांच्या भोंगळ कारभारामुळे रविवारी दुपारी एक वाजेपर्यंत ही बस हलविण्यात आली नव्हती. त्यामुळे कात्रज घाटातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना रविवारी दुपारपर्यंत वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. 

हे पण वाचा - आता कोरोना व्हायरसला घाबरायची गरज नाही; हे वाचा! 

रविवारी पहाटे कात्रज जुन्या घाटात पुण्याकडे जाणारी शिवशाही बस बंद पडली. वाहतूक पोलिस आणि एसटी महामंडळ यांनी ताबडतोब ही बस बाजूला घेणे गरजेचे होते. मात्र रविवारी दुपारपर्यंत ही बस घाटात तशीच होती. त्यातच रविवारची सुट्टी असल्याने साताऱ्याच्या दिशेने जाणाऱ्या नागरीकांची संख्या मोठी होती. त्यामुळे घाटात पुण्याकडे आणि साताऱ्याकडे जाणाऱ्या दोन्ही बाजूला वाहतूक कोंडी झाली होती. रविवार दुपारी एक वाजेपर्यंत ही बस हलविण्यात आली नव्हती. त्यामुळे या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची मोठी गैरसोय झाली.  

रविवारी पहाटे ही बस कात्रज घाटात बंद पडली होती. त्यामुळे या बसच्या बाजूच्या एका लेन मधून पहाटेपासून वाहतूक सुरु होती. त्यामुळे दोन्ही बाजूला वाहतूक कोंडी होत होती, असे स्थानिक नागरीकांनी सांगितले.

अखेर दुपारी एक वाजण्याच्या सुमारास एसटी महामंडळाच्या ब्रेक डाउन व्हॅनने ही बस बाजूला केली. त्यानंतर घाटातील वाहतूक सुरळीत झाली.

हे पण वाचा - आता कोरोना व्हायरसला घाबरायची गरज नाही; हे वाचा! 

याबाबत भारती विद्यापीठ वाहतूक विभागाचे पोलिस निरीक्षक विष्णु पवार म्हणाले, "बस बंद पडल्याची माहिती मिळताच त्याठिकाणी वाहतूक कर्मचारी पाठविण्यात आले होते. मात्र तोपर्यंत एसटी महामंडळाने ही बस बाजूला घेतली होती."
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: heavy Traffic in katraj ghat