

heavy vehicles ban in pune city
पुणे - गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील मध्यवर्ती भागात होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पुणे पोलिसांनी जड वाहनांच्या वाहतुकीवर निर्बंध घातले आहेत. गणपती विसर्जनापर्यंत, म्हणजेच १२ ते २६ सप्टेंबरदरम्यान मध्यवर्ती भागातील प्रमुख रस्त्यांवर जड व अवजड वाहनांना प्रवेश बंद राहणार आहे. या काळात वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलिसांकडून विशेष नियोजन करण्यात आले आहे.