
मांजरी : बंदी असूनही मुंढवा-मांजरी, वाघोली-मांजरी, कोलवडी-मांजरी, मांजरी-महादेवनगर, सोलापूर रस्ता, सासवड रस्ता, महंमदवाडी रस्ता, खराडी रस्ता या रस्त्यांवर सर्रास अशी अवजड वाहनांची वाहतूक होत आहे. भरधाव धावणाऱ्या या वाहनांमुळे वाहतूक कोंडीबरोबरच अपघाताचा धोकाही वाढला आहे. वाहतूक पोलिसांनी याबाबत गांभीर्याने घेऊन बंदीच्या काळात धावणाऱ्या अशा वाहनांवर कठोर कारवाई करण्याची गरज नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.