अवजड वाहनांची वाहतूक ठरत आहे बारामतीकरांसाठी जीवघेणी

मिलिंद संगई
शुक्रवार, 4 मे 2018

बारामती (पुणे) : शहरातील भिगवण रस्त्यावर झालेल्या अपघातात आज एका महिलेस प्राण गमवावे लागले. सुनीता नितीन भापकर (वय 45, रा. वीरशैव मंगल कार्यालायनजीक बारामती) यांचा या अपघातात मृत्यू झाला. 

या अपघातानंतर अवजड वाहनांची शहराच्या मुख्य रस्त्यांवरुन बिनदिक्कत होणारी वाहतूक बारामतीकरांसाठी जीवघेणी ठरत असल्याचे पुन्हा स्पष्ट झाले. भिगवण रस्ता हा अवजड वाहतूकीसाठी बंद करावा अशी आज पुन्हा एकदा एकमुखी मागणी झाली. 

सकाळी आठ वाजता सम्यक दुकानानजीक हा अपघात झाला. सुनीता आपल्या दुचाकीवरून जिमला निघाल्या होत्या. त्याच वेळेस भिगवण कडे निघालेल्या कंटेनर ची त्यांना जोरदार धडक बसली, यात त्यांची दुचाकी कंटेनर खाली गेली व त्यांच्या अंगावरून चाक गेल्याने त्यांचा मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच नगराध्यक्ष पौर्णिमा तावरे यांनी घटनस्थळी धाव घेत मदत केली. शहर पोलीसांना अनेकांनी फोन केले पण त्यांनी उदासिनता दाखविली अखेर उपविभागीय पोलिस अधिकारी बापू बांगर यांच्या मार्फत निरोप दिल्यानंतर शहर व तालुक्याचे पोलिस घटनास्थळी दाखल झाले. 

दुसरीकडे 108 क्रमांकावर फोन करुनही रुग्णवाहिकेने येण्यास नकार दिल्याचे  नागरिकांनी सांगितले, अखेर नागरिकांनी सुनीता यांना दवाखान्यात हलविले मात्र त्यांची प्राणज्योत मालविली होती. 

तर जीव वाचला असता...
रेल्वे उड्डाणपूलावरुन अवजड वाहनांची वाहतूक होऊ देऊ नका अशा स्पष्ट सूचना माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देऊनही नगरपालिका प्रशासनाने या बाबत काहीही न केल्याने बिनदिक्कत वाहतूक या पूलावरुन होत होती. त्यातून आज सुनीत भापकर यांना आपला जीव गमवावा लागला.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: heavy vehicles traffic dangerous for citizens of baramati