
पुणे : शहरातील रस्त्यांवर वाहनांची संख्या वाढत आहे. वर्दळीच्या कालावधीत अवजड वाहनांना वाहतुकीस बंदी घातली आहे, तरीही नियमांचे उल्लंघन केले जात आहे. पायाभूत सुविधांचा अभाव, धोकादायक रस्ते, अतिक्रमण आणि बेफाम वाहनचालकांमुळे निष्पाप नागरिकांचे मृत्यू होत आहेत. प्रशासनाने अपघात रोखण्यासह वाहतूक सुरक्षित करण्यासाठी वरवरची मलमपट्टी न करता ठोस उपाययोजनेची गरज आहे.