
सासवड : पुरंदर तालुक्यात ढगफुटीप्रमाणे झालेल्या पावसामुळे अनेक गावांमध्ये प्रचंड मोठे नुकसान झाले आहे. कुणाची घरे, कुणाची पिके तर कुणाच्या बागा उध्वस्त झाल्या आहेत. या अतिवृष्टीचे ताबडतोब पंचनामे सुरू करा आणि शेतकऱ्याला लवकरात लवकर मदत मिळण्यासाठी उचित कार्यवाही करावी; अशी मागणी माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी जिल्हा व तालुका प्रशासनाकडे केली आहे.
जिल्हाधिकारी राजेंद्र देशमुख यांच्याशी याबाबत तातडीने पत्रव्यवहार शिवतारे यांनी केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यापासून सासवड उपविभागीय अधिकारी प्रमोद गायकवाड, तहसिलदार रुपाली सरनोबत यांनाही त्यांनी याबाबत कळविले आहे. याबाबत शिवतारे म्हणाले; कोरोनाच्या काळात शेतकरी आधीच तोट्यात गेलेला आहे. दुधाला पुरेसा भाव मिळत नसल्याने पूरक व्यवसायाची स्थितीही काहीशी नाजूकच आहे. अशा वेळीच ढगफुटी आणि अतिवृष्टीचे हे दुहेरी संकट समोर आले आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांना मी तात्काळ कार्यवाही करण्यासाठी कळविले आहे. पंचनाम्याबद्दल काही तक्रारी असल्यास थेट माझ्याशी संपर्क करावा; असेही शिवतारे यांनी सांगितले आहे.
जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
दरम्यान सासवडपासून पिंपळे, पांगारे, पिलाणवाडी, यादववाडी, परींचे, राऊतवाडी, वीर, पिंगोरी, दौंडज, वाल्हे, हरणी, जेऊर, मांडकी व इतर अनेक गावांना मोठा तडाखा बसल्याचे वृत्त आहे. रुद्रगंगा नदीने रात्री धोक्याची पातळी गाठली होती असेही प्रत्यक्षदर्शीनी कळवले आहे. त्यामुळे पुढील कार्यवाहीवर लक्ष आहे.
(संपादन : सागर दिलीपराव शेलार)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.