Pargaon News : मित्रत्वाचा माणुसकीचा हात! लक्ष्मीपुजनाच्या दिवशी अपघाती निधन झालेल्या पंढरीनाथ सुक्रे यांच्या कुटुंबासाठी मित्रांनी उभारला पावणेपाच लाखांचा मदतनिधी

दिवाळी सणात लक्ष्मीपूजनाच्या दिवशी (दि. ८) नोव्हेंबर रोजी जुन्नर तालुक्यातील औरंगपूर ते पारगाव (मंगळूर) रस्त्यावर झालेल्या अपघातात पंढरीनाथ सुक्रे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
Pandharinath Sukre

Pandharinath Sukre

sakal

Updated on: 

पारगाव - खडकवाडी, ता. आंबेगाव येथील पंढरीनाथ किसन सुक्रे (वय ४४ वर्ष ) यांच्या अपघाती निधनानंतर त्यांच्या कुटुंबाच्या मदतीसाठी मित्रांनी पुढाकार घेत दशक्रियेच्या दिवसापर्यंत तब्बल पावणेपाच लाख रुपयांचा मदतनिधी जमा केला. मित्रांच्या या माणुसकीच्या उपक्रमाचे परिसरातून कौतुक होत आहे.

Loading content, please wait...