उरवडे : आगीच्या दुर्घटनेत मृत्यू झालेल्यांच्या वारसांना मदतीचे हात

पिरंगुट येथील पोलिस मदत केंद्रात कंपनीचे प्रतिनिधी सुनील शहा व मृतांच्या वारसांमध्ये झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
Uarwade Accident
Uarwade AccidentSakal

पिरंगुट - उरवडे (ता. मुळशी) (Uarwade) येथील एसव्हीएस कंपनीत (SVS Company) ७ जून रोजी झालेल्या आगीच्या दुर्घटनेत (Fire Accident) मृत्यू (Death) झालेल्यांच्या वारसांना (Heir) कंपनीकडून प्रत्येकी दहा लाख रुपयांच्या मदतीचे (Help) धनादेश दिले आहेत. तसेच, कंपनी सुरू झाल्यावर एका वारसाला कंपनीत नोकरी देणार व दुर्घटनाग्रस्त व्यक्तीच्या मुलांना पदवीपर्यंत मोफत शिक्षणाचा (Free Education) खर्च करण्याचे कंपनी प्रशासनाने मान्य केले आहे. तसेच, राज्य सरकारकडून प्रत्येकी ५ लाख रुपये, केंद्र शासनाकडून प्रत्येकी २ लाख रुपये, भविष्य निर्वाह निधीतून प्रत्येकी ५ लाख रुपये व कामगार राज्य विमा महामंडळाकडून पेन्शन मिळणार आहे. (Helping Hands Heirs of those who Died in the Fire Accident)

पिरंगुट येथील पोलिस मदत केंद्रात कंपनीचे प्रतिनिधी सुनील शहा व मृतांच्या वारसांमध्ये झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार, या दुर्घटनेतील मृत सदस्याच्या कायदेशीर वारसदारास (मुलगा, मुलगी, आई, वडील, पत्नी) यांना दहा लाख रुपये कंपनीकडून देण्यात येईल. घटनेतील मृत सदस्याच्या मुलाच्या अथवा मुलीच्या यापुढील शिक्षणाचा खर्च कंपनी करेल. त्यासाठी इयत्ता पहिली ते पदवीपर्यंत येणारा खर्च कंपनी करणार.

Uarwade Accident
अकरावी प्रवेशाच्या सीईटी परीक्षेसाठी शिक्षण आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन

घटनेतील सतरापैकी बारा मृत सदस्यांच्या कायदेशीर वारसदारास कर्मचारी राज्य विमा निगमकडून मिळणाऱ्या रकमेसाठी लागणाऱ्या कागदपत्रांची सगळी पूर्तता कंपनीकडून पूर्ण झाली असून, उरलेल्या पाच मृत सदस्यांच्या कायदेशीर वारसदारांच्या कागदपत्रांची पूर्तता देखील कंपनीकडून पूर्ण झाली आहे. या घटनेतील सर्व मृत सदस्यांच्या कायदेशीर वारसदारास ‘पीएफ’कडून मिळणाऱ्या रकमेसाठी लागणाऱ्या कागदपत्रांचीही सगळी पूर्तता कंपनीकडून पूर्ण झाली आहे. भविष्यात कंपनी पुनर्स्थापित झाल्यानंतर मृत सदस्यांच्या कायदेशीर वारसदारास कंपनीत कामावर रुजू करून घेण्यात येईल.

दरम्यान, भाऊ आखाडे यांनी शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांच्याशी संपर्क साधला होता. त्यांनी भालगुडी येथील दोन्ही साठे कुटुंब व करमोळी येथील तुपे कुटुंबाला प्रत्येकी पंचवीस हजार रुपयांची मदत केली आहे.

Uarwade Accident
सदनिका भाड्याने घेण्याच्या बहाण्याने महिलेस घातला दिड लाख रुपयांना गंडा

निवृत्तिवेतन मिळणार

केंद्रीय कामगार मंत्रालयांतर्गत असलेल्या कर्मचारी राज्य विमा निगमच्या व्यवस्थापक मनिषा लिखिते व बबन मरगळे व भाऊ आखाडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतांच्या वारसांना कर्मचारी राज्य विमा निगम (बाणेर कार्यालय) च्या माध्यमातून पगाराच्या नव्वद टक्के निवृत्तीवेतन मिळणार आहे. ज्या बारा मृत कामगार सदस्यांची नोंदणी झालेली आहे, त्यांच्या कुटुंबाला कर्मचारी राज्य विमा निगमकडून प्रत्येकी १५ हजार रुपये अंत्यविधी खर्च दिला आहे.

मदतीचे स्वरूप

राज्य सरकारचा निधी प्रत्येकी ५ लाख रुपये, केंद्र शासनाचा निधी प्रत्येकी २ लाख रुपये, कंपनी मालकाकडून प्रत्येकी १० लाख रुपये, भविष्य निर्वाह निधी प्रत्येकी ५ लाख रुपये, कामगार राज्य विमा महामंडळाकडून पेन्शन.

राज्य सरकारकडून प्रत्येकी एक लाख रुपयाप्रमाणे सतरा लाख रुपये आले आहेत. येत्या दोन ते तीन दिवसांत उर्वरित प्रत्येकी ४ लाख येतील. त्यानंतर एकत्र ५ लाख रुपये वाटप करणार आहोत. अद्याप केंद्राकडून प्रत्येकी २ लाख रुपये येणे आहेत.

- अभय चव्हाण, तहसीलदार, मुळशी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com