अकरावीच्या सीईटीतील अडचणींसाठी हेल्पलाइन सुविधा उपलब्ध

अकरावी प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या सामाईक प्रवेश परीक्षेतील (सीईटी) अडचणींसाठी हेल्पलाइन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
CET Exam
CET ExamSakal

पुणे - अकरावी प्रवेशासाठी (Eleventh Admission) घेण्यात येणाऱ्या सामाईक प्रवेश परीक्षेतील (सीईटी) (CET) अडचणींसाठी हेल्पलाइन सुविधा (Helpline Facility) उपलब्ध करून देण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने विभागवार संपर्क क्रमांक आणि ईमेल आयडी घोषित करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना (Student) येणाऱ्या अडचणींसंदर्भात या ठिकाणी मार्गदर्शन करण्यात येणार आहे. (Helpline Facility Available for Problems in the 11th CET Exam)

शैक्षणिक वर्ष २०२१-२२ च्या प्रवेशासाठी येत्या २१ ऑगस्टला ही परिक्षा घेण्यात येणार आहे. दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना ‘http://cet.mh-ssc.ac.in’ या संकेतस्थळावर परीक्षेसाठी अर्ज करता येणार आहेत. मंडळाशी संलग्न असलेल्या कनिष्ठ महाविद्यालयातील अकरावी प्रवेशासाठी ही परीक्षा होणार आहे. ही परीक्षा विद्यार्थ्यांसाठी पूर्णपणे ऐच्छिक असून, ती ऑफलाइन स्वरूपात होईल. राज्य मंडळाच्या दहावीच्या अभ्यासक्रमावर सीईटी परीक्षा आधारित असून, त्यासाठी वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाची प्रश्नपत्रिका असेल. परीक्षेसाठी १०० गुणांची एकच प्रश्नपत्रिका असून, त्यासाठी दोन तासांचा कालावधी देण्यात येईल. विद्यार्थ्यांना २६ जुलैपर्यंत परीक्षेसाठी अर्ज भरता येईल, अशी माहिती राज्य मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी दिली आहे. अधिक माहितीसाठी मंडळाच्या संकेतस्थळाला भेट देऊ शकता.

CET Exam
मनसेचे गतवैभव परत आणायचं; राज ठाकरे यांचे आदेश

हेल्पलाईनचा तपशील -

विभागीय मंडळ - संपर्क क्रमांक

१) पुणे - ९६८९१९२८९९ / ८८८८३३९५३०

२) नागपूर - ९४०३६१४१४२ / ९८९०५१४८३९

३) मुंबई - ९४२३९३३४३५, / ९८६९०८६०६१

४) औरंगाबाद - ९९२२९००८२५ / ९४२३४६९७१२

५) अमरावती - ९९६०९०९३४७ / ९४२३६२१६४७

६) कोल्हापुर - ७५८८६३६३०१ / ८००७५९७०७१

७) नाशिक - ८८८८३३९४२३ / ८३२९००४८९९

८) लातुर - ९४२१६९४२८२ / ९४२१७६५६८३

९) कोकण - ८८०६५१२२८८/ ८८३०३८४०४४

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com