हेमा महाजन यांचे निधन; इच्छेनुसार देहदान...

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 12 फेब्रुवारी 2020

तळेगाव ढमढेरे (पुणे) : मूळ इंदापूर (जि. पुणे, सध्या रा. पिंपळे निलख, पुणे) येथील समाजवादी विचारांच्या सेवानिवृत्त अधिकारी हेमा रत्नाकर महाजन (वय 69) यांचे अल्पशा आजाराने मंगळवारी निधन झाले. त्यांच्या इच्छेनुसार ससून रुग्णालयात देहदान करण्यात आले. त्यांच्या मागे पती, मुलगी, दीर, नातू असा परिवार आहे. महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसचे प्रवक्ते व राज्य नियोजन मंडळाचे माजी कार्यकारी अध्यक्ष डॉ. रत्नाकर महाजन यांच्या त्या पत्नी होत.

हेमा महाजन यांनी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळामध्ये पर्यटन विकास अधिकारी म्हणून सेवा केली आहे; तसेच पुणे विभागात पर्यटन विकासासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले. महामंडळाने सुरू केलेल्या नूतन निवास न्याहारी योजनेचा त्यांच्या काळात विस्तार झाला. त्या पुण्याच्या "साधना' साप्ताहिकात व हडपसर येथील महाराष्ट्र आरोग्य मंडळात कार्यरत होत्या.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: hema mahajan passes away