मुर्टीच्या हेमंत कुंभार यांना एआय संशोधनासाठी पीएचडी
मोरगाव, ता. १६ : मुर्टी (ता. बारामती) गावचे सुपुत्र, संशोधक डॉ. हेमंत कुंभार यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आणि डेटा सुरक्षा क्षेत्रात महत्त्वपूर्ण संशोधन पूर्ण करीत पीएच.डी. पदवी संपादन केली. त्यांनी आपले संशोधन केएल विद्यापीठ (विजयवाडा, आंध्रप्रदेश) येथून डॉ. एस. श्रीनिवासराव यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण केले. गोपनीयता जपत सुरक्षित कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचे महत्त्व ओळखणे, या विषयावर त्यांनी संशोधन केले आहे.
आजच्या डिजिटल युगात नागरिकांचा वैयक्तिक व संवेदनशील डेटा मोठ्या प्रमाणात डिजिटल स्वरूपात वापरला जातो. मात्र, मशिन लर्निंग किंवा एआय प्रणाली विकसित करताना हा डेटा उघड करण्याची गरज भासते. ज्यामुळे गोपनीयतेला गंभीर धोका निर्माण होतो. हीच समस्या लक्षात घेऊन डॉ. कुंभार यांनी गोपनीयता जपणारे आणि सुरक्षित मशीन लर्निंग अल्गोरिदम विकसित केले, जे त्यांचे मुख्य संशोधन योगदान आहे. त्यांनी ‘होमोमॉर्फिक एन्सक्रिप्शन’ या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून अशी प्रणाली तयार केली की, डेटा डिक्रिप्ट न करता थेट विश्लेषण करता येते, वैयक्तिक माहिती पूर्णपणे सुरक्षित राहते, डेटा चोरी किंवा गैरवापराचा धोका कमी होतो आणि एआय प्रणाली वेगाने व अचूक कार्य करते. त्यांनी विकसित केलेल्या ‘‘LeKNet मशिन लर्निंग’ अल्गोरिदममुळे सुरक्षित पद्धतीने विश्लेषण अवघ्या ०.३४७ सेकंदात करता येते. ज्यामुळे कार्यक्षमता आणि सुरक्षा दोन्ही वाढतात. ही प्रणाली आरोग्य सेवा, बँकिंग व वित्त, शासकीय व ई-गव्हर्नन्स सेवा, विमा व संशोधन संस्था, शिक्षण व उद्योग आदी क्षेत्रात सुरक्षित आणि गोपनीय मशिन लर्निंग वापरण्यासाठी हे तंत्रज्ञान अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.
डॉ. हेमंत कुंभार यांनी शिवनगर विद्या प्रसारक मंडळाच्या कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग माळेगाव येथे १७ वर्षे प्राध्यापक म्हणून सेवा बजावली. त्यापैकी ५ वर्षे संगणक अभियांत्रिकी विभागप्रमुख म्हणून ते कार्यरत होते. त्यानंतर त्यांनी सॉफ्टवेअर क्षेत्रात प्रवेश केला. ते मागील ४ वर्षांपासून आयटी क्षेत्रात कार्यरत आहेत. सध्या ते एचसीएल टेक या आंतरराष्ट्रीय आयटी कंपनीमध्ये वरिष्ठ प्रकल्प अधिकारी म्हणून काम पाहत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

