Kajal Padwal : अन्..... तिचे डॉक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण झाले; शेलू गावासह पंचक्रोशीतील ठरली पहिली महिला डॉक्टर

काजल पडवळ या युवतीने घरात फारशी शैक्षणिक पार्श्वभूमी नसताना देखील नामवंत महाविदयालयातून वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले.
Doctor Kajal Padwal
Doctor Kajal Padwalsakal
Updated on

आंबेठाण - 'इच्छा असेल तर मार्ग दिसेल' या उक्ती प्रमाणे शेतीप्रधान गाव असणाऱ्या शेलू (ता. खेड) येथील काजल पडवळ या युवतीने घरात फारशी शैक्षणिक पार्श्वभूमी नसताना देखील नामवंत महाविदयालयातून वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले.

तिच्या या प्रयत्नामुळे गावातच नव्हे तर पंचक्रोशीत पहिली महिला डॉक्टर होण्याचा बहुमान काजल पडवळ हिने मिळवला. या यशस्वी वाटचालीमुळे डॉ. काजलचे सर्वत्र कौतुक होत आहे.

खेड तालुक्याच्या पश्चिम भागातील आणि भामनेर खोऱ्यातील शेलू गाव. गावात फक्त प्राथमिक शिक्षणाची सुविधा असताना अशा परिस्थितीत प्राथमिक शिक्षणानंतर शालेय शिक्षण भांबोली येथे भामचंद्र विद्यालय येथे घेतले.

राजगुरूनगर येथे हुतात्मा राजगुरू महाविद्यालयात महाविद्यालयीन शिक्षण झाल्यानंतर उच्च शिक्षणासाठी नीट परीक्षा उत्तीर्ण करून ग्रँट वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेतला.गुणवत्ता व चिकाटी या जोरावर मुंबई येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर जेजे रुग्णालयातून आपले एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण केले असून तिने शेलू गावातील पहिली महिला डॉक्टर होण्याचा मान मिळवला. 

काजलने आजोबा कै. किसन भागुजी पडवळ, आई द्वारका, वडील मोहन पडवळ यांचे स्वप्न पूर्ण केले. लहानपणापासूनच काजलची डॉक्टर बनण्याची इच्छा होती. आपले आई, वडील व शिक्षकांच्या आशीर्वादाने शेतकरी कुटुंबातील निरक्षर आई वडिलांची मुलगी यशस्वी होऊ शकते याचे प्रत्यक्ष उदाहरण काजलने समाजासमोर ठेवले आहे.

शेलू व पंचक्रोशीच्या नागरिकांच्यावतीने झालेल्या सत्कार कार्यक्रमात भविष्यकाळात समाजोपयोगी कामे करून रुग्णांची सेवा काजलने करावीत अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली.

दरम्यान भांबोली येथील भामचंद्र विद्यालयाच्या वतीने डॉ. काजलच्या यशाबद्दल तिचे अभिनंदन केले.

डॉ. काजल पडवळ -

मी लहान असल्यापासून पाहत आहे की ग्रामीण भागात आरोग्यच्या फारशा सुविधा उपलब्ध नसतात. त्यामुळे अनेकांना मोठ्या आजारांना सामोरे जावे लागत आहे. गरिबीची, कष्टाची जाणीव ठेवत डॉक्टर व्यवसाय करताना सामाजिक बांधिलकी नेहमी जपण्याचा प्रयत्न करीन आणि रुग्णांची सेवा हेच परम कर्तव्य समजून रुग्ण सेवा करीन.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com