जुन्नर - हेरीटेज होमस्टेसाठी शिवनेरी परिसरातील जुन्या ऐतिहासिक वाड्यांना प्रशासकीय अधिकारी व हॉटेल कन्सल्टंटच्या शिष्टमंडळाने आज ता.०७ रोजी भेटी देऊन पाहणी केली.
यावेळी शिवनेरी परिसरातील कुसुर, निरगुडे, खामगाव आदी गावांमधील जुन्या वाड्यांची पाहणी करण्यात आली. किल्ले शिवनेरीला युनेस्को मानांकन दर्जा प्राप्त झाल्यानंतर शिवजन्मभूमीत भविष्यात पर्यटकांचा वाढता ओघ लक्षात घेता होमस्टे सुरु करण्यासाठी प्रशासनाकडून पावले उचलण्यात आली आहेत. यामुळे सह्याद्री गिरीभ्रमण संस्थेच्या संकल्पनेला पाठबळ मिळाले आहे.