'हिरो'ची ई-सायकल बाजारात; बँटरीवर 60-70 किमी धावणार

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 10 नोव्हेंबर 2019

'लेक्‍ट्रो ईएचएक्‍स 20'चे वजन 23 किलो असून, 100 किलोचा भार ही ई-सायकल वाहून नेऊ शकते. या ई-सायकलचा कमाल वेग 25 किमी प्रतितास असून एकदा बॅटरी चार्ज केल्यानतंर 60-70 किलोमीटरचे अंतर धावू शकणार आहे. यातील लिथियम आयन बॅटरीची क्षमता 10.9 एएचची आहे. 

पुणे : हिरो सायकलने 'लेक्‍ट्रो ईएचएक्‍स 20' ही नवी इलेक्‍ट्रीक सायकल बाजारात आणली आहे. 'यामाहा'बरोबर संयुक्‍तपणे ही सायकल बाजारपेठेत आणली आहे. या सायकलचे वैशिष्ट्य म्हणजे यात इलेक्‍ट्रीक बॅटरी आणि मोटर जोडलेली आहे. त्यामुळे ग्राहक पॅडलचा वापर करून सायकल चालवू शकतीलच; त्याचबरोबर इलेक्‍ट्रीक बॅटरी आणि मोटरची सुविधा असल्यामुळे विनाश्रम आणि पॅडलविनाही एखाद्या मोटारसायकलप्रमाणे ही सायकल चालवता येणार आहे. 

"भारतीय बाजारपेठेतील भविष्यातील गरज लक्षात घेऊन ही नवी ई-सायकल विकसित करण्यात आली आहे. इलेक्‍ट्रीक सायकल असल्यामुळे पारंपरिक वाहनांमुळे मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या प्रदूषणावरही याद्वारे उपाय शोधता येईल. भविष्यातील दळणवळणाचा ट्रेंड यातच दडलेला आहे,'' असे मत "लेक्‍ट्रो ईएचएक्‍स 20'च्या अनावरणाप्रसंगी हिरो सायकल्सचे आदित्य मुंजाळ यांनी व्यक्त केले. 

'लेक्‍ट्रो ईएचएक्‍स 20'चे वजन 23 किलो असून, 100 किलोचा भार ही ई-सायकल वाहून नेऊ शकते. या ई-सायकलचा कमाल वेग 25 किमी प्रतितास असून एकदा बॅटरी चार्ज केल्यानतंर 60-70 किलोमीटरचे अंतर धावू शकणार आहे. यातील लिथियम आयन बॅटरीची क्षमता 10.9 एएचची आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hero Cycle launches new electric bicycle Lectro EHX20