
तळेगाव स्टेशन : कुंडमळा येथील साकव (पूल) कोसळल्यानंतर दुसऱ्या दिवशी सोमवारी (ता. १६) पोलिस, प्रशासन, ‘एनडीआरएफ’चे शोध पथक आणि स्थानिक रहिवासी यांची तुरळक वर्दळ वगळता कुंडमळ्यातील इंद्रायणी नदीपात्राच्या किनाऱ्यावर शुकशुकाट होता. पुलाच्या लोखंडी सांगाड्यात अडकलेल्या दुचाकी नदीपात्रात दिसत होत्या. कोसळलेल्या साकवचा उर्वरित भाग प्रशासनाकडून दुतर्फा अडथळे लावून बंद करण्यात आला होता.