घरातील हवा प्रदूषणाचा धोका सर्वाधिक

The Hidden Air Pollution in Our Homes is most dangerous
The Hidden Air Pollution in Our Homes is most dangerous

पुणे : ‘‘प्रदूषित हवा ही केवळ घराबाहेरील वातावरणातच असते आणि हवा प्रदूषणाचे स्रोतही घराबाहेरच असतात असा बहुतांशी लोकांचा समज असतो. मात्र, असे समजणे चूक ठरेल. केवळ औद्योगिक क्षेत्रातून, वाहनांतून हवा प्रदूषण होत आहे असे समजणे चूक ठरेल. आपणही या प्रदूषणात व्यक्तिगतरीत्या भर घालतो हे प्रत्येकाने मान्य करायला हवे.’’ असे प्रतिपादन पल्मोकेअर रिसर्च अँड एज्युकेशनचे (प्युअर) संचालक डॉ. संदीप साळवी यांनी केले. वातावरण फाउंडेशन आणि रोटरी क्लब, पामबीच, नवी मुंबई यांच्या वतीने जागतिक अयोग्य दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या ‘कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हवा प्रदूषणाचे मानवी आरोग्यावर होणारे दुष्परिणाम’ या ऑनलाइन चर्चासत्रात ते बोलत होते. यावेळी पल्मनरी मेडिसिन आणि पर्यावरण प्रदूषण संशोधन केंद्राच्या डॉ. अमिता आठवले,  नागपूरच्या क्रीम्स रुग्णालयाचे डॉ. समीर अर्बट, बालरोगतज्ञ डॉ. अदिती शहा आदींनी सहभाग घेतला होता. 

डॉ. साळवी म्हणाले, ‘‘घरात जाळण्यात येणाऱ्या एक मच्छरच्या कॉईलमधून निघणारा धूर जवळपास १०० सिगारेट ओढल्यावर जेवढे घातक प्रदूषण आपल्या शरीरात जाते तेवढे घातक प्रदूषण घराच्या आत निर्माण करण्यास कारणीभूत ठरतो. घरात जळणारी एक धूप अगरबत्ती ही ५०० सिगारेट्स इतके घातक प्रदूषण तयार करते. आजही ग्रामीण भागात जेवण बनवण्यासाठी चुलीचा वापर केला जातो. त्यात जाळले जाणारे जे घटक आणि त्यातून निर्माण होणारे प्रदूषण हे ‘सीओपीडी’ या आजाराचे मुख्य कारण ठरताना दिसत आहे.’’

हे वाचा - नऱ्हे येथे कोविड सेंटर आजपासून सुरू; वाढत्या रुग्णसंख्येमुळे जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय

डॉ. अर्बट म्हणाले, ‘‘हवा प्रदूषणामुळे फुफ्फुसासंबंधी आजार उद्भवतात. तसेच फुफ्फुसांच्या रोगप्रतिकार क्षमतेवर आघात करते. त्यामुळे आम्हाला श्वसनाच्या गंभीर आजारांना सामोरे जावे लागते. येणाऱ्या काळात कोरोना नंतर सर्वात मोठी महामारी हवा प्रदूषणाच्या रूपाने येईल. तर याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. त्यामुळे हवा प्रदूषणाच्या धोक्याला वेळीच आळा घालणे महत्त्वाचे आहे.’’

अजितदादांना सायकलवरून शाळेत सोडणाऱ्या जालिंदर काकांचं निधन

‘‘मूले, महिला आणि वयोवृद्ध लोक सर्वाधिक वेळ घरात राहतात त्यामुळे घरातील प्रदूषण हा आरोग्याला धोका निर्माण करणारे मुख्य कारण ठरत आहेत. मोठमोठ्या उद्योगधंद्यांसाठी नियमावली बनवू शकतो मात्र, लहान उद्योगांसाठी ते करता येत नाही. तसेच छोटे छोटे उद्योगांमधून मोठे प्रदूषण तयार होते. त्याचप्रमाणे घरातील प्रदूषण छोटेखानी असल्याने त्याकडे आपण दुर्लक्ष करत असतो. हे येणाऱ्या काळात घातक ठरू शकते.’’
- अमिता आठवले, केईएम रुग्णालय (मुंबई)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com