police bandobast in pune for election
sakal
पुणे - महापालिका निवडणूक शांततापूर्ण, निर्भय व पारदर्शक वातावरणात पार पडावी, यासाठी शहर पोलिस आयुक्तालयाकडून वरिष्ठ अधिकाऱ्यांसह सुमारे १४ हजार पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. याशिवाय तीन हजार २५० होमगार्डची नेमणूक करण्यात आली आहे.
पोलिस आयुक्त अमितेश कुमार आणि पोलिस सहआयुक्त रंजनकुमार शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वंकष बंदोबस्ताचे नियोजन केले आहे.