
पुणे : मुंबई उच्च न्यायालयाने मुठा नदीच्या पूररेषेपासून १०० मीटर अंतरात कोणतेही बांधकाम करण्यास बंदी घालण्याची मागणी करणारी याचिका फेटाळत यावरील निर्णय तज्ज्ञ समितीवर सोडला आहे. समितीने दोन महिन्यांच्या आता त्यांचा अहवाल राज्य सरकारला सादर करावा. त्यानंतर पुढील दोन महिन्यांत सरकारने निर्णय घेऊन पुढील कार्यवाही करावी, असा आदेश न्यायालयाने दिला आहे.