Pune Grand cycle Tour
sakal
- सौरभ ढमाले
पुणे - पुणे ग्रँड टूरच्या ट्रॅकवर सुरू असलेली स्पर्धा ही केवळ सायकलपटूंच्या शारीरिक क्षमतेची परीक्षा नाही, तर अत्याधुनिक आणि लाखो रुपयांच्या सायकलींमागील तंत्रज्ञानाचीही चुरस आहे. एका बटणाच्या स्पर्शावर गिअर बदलणाऱ्या सायकली आधुनिक अभियांत्रिकी, विज्ञान आणि संशोधनाचा उत्कृष्ट आविष्कार ठरतात.