इंदापूर - वरकुटे (ता. इंदापूर) येथे पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर पुणे बाजूकडून सोलापूरच्या दिशेने निघालेल्या तीनचाकी सहा आसनी रिक्षाला पाठीमागून भरधाव मोटारीने जोरदार धडक दिली. यामुळे रिक्षामधील दोन लहान मुलांसह सात प्रवासी गंभीर जखमी झाले. त्यातील दोघांची प्रकृती चिंताजनक आहे.