हिंदवी स्वराज्य महासंघाची स्थापना | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पुणे - मराठा साम्राज्यातील राज व सरदार घराण्यांतील वंशजांनी एकत्र येऊन हिंदवी स्वराज्य महासंघाची स्थापना नुकतीच केली.

मार्गदर्शक पालक
हिंदवी स्वराज्य महासंघाचे मार्गदर्शक पालक म्हणून श्रीमंत छत्रपती बाबाजी राजे भोसले (तंजावर), श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले (सातारा), युवराज श्रीमंत संभाजीराजे छत्रपती (कोल्हापूर) कार्यरत राहणार आहेत. इतिहास अभ्यासक पांडुरंग बलकवडे सल्लागार असतील, असे महासंघाने कळविले आहे.

हिंदवी स्वराज्य महासंघाची स्थापना

पुणे - मराठा साम्राज्यातील राज व सरदार घराण्यातील वंशजांनी एकत्र येत हिंदवी स्वराज्य महासंघाची स्थापना केली आहे. या ट्रस्टच्या अध्यक्षपदी श्रीमंत छत्रपती शिवाजीराजे भोसले (तंजावर), तर कार्याध्यक्षपदी श्रीमंत महेंद्रसिंह पेशवा यांची निवड झाली आहे. ट्रस्टची नुकतीच शहरात बैठक झाली. तीत ही निवड करण्यात आली आहे.

छत्रपती शिवाजी महाराज आणि श्रीमंत बाजीराव पेशवे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या महासंघाची अध्यक्ष आणि कार्याध्यक्ष ही पदे कायमस्वरूपी छत्रपती व पेशवा घराण्याकडेच असतील. ट्रस्टच्या वरिष्ठ उपाध्यक्षपदी विक्रमसिंह मोहिते (मुंबई), रघुजीराजे आंग्रे (अलिबाग), अमरजितराजे बारगळ जहागीरदार (तळोदा), डॉ. नारायण विंचूरकर (नाशिक), नीलराजे पंडित, अमात्य बावडेकर (कोल्हापूर), उपाध्यक्षपदी उदय सोळंके (दिल्ली), शिरीष चिटणीस (सातारा), महामंत्रिपदी रणजित नातू (पुणे), सहमंत्रिपदी योगेश्‍वर गंधे, रवींद्र कंक (पुणे), कोशप्रमुखपदी अशोकराव पलांडे (पुणे), सदस्यपदी रणजितसिंह गरुड, रेहान सरदार, समीर पोतणीस, कैलास मेहेंदळे (सर्व पुणे)आणि माणिकराव बावणे (उदगीर) यांची निवड झाली आहे. तसेच, युवा समितीच्या अध्यक्षपदी भूषणसिंह होळकर, तर महिला समितीच्या अध्यक्षपदी बेगम शाहिन अवैस बहादूर (समशेर बहादूर, बांदा नवाब) यांची निवड झाली आहे. हिंदवी स्वराज्य स्थापना दिवस (२७ एप्रिल), अटक विजय दिन (१० ऑगस्ट), दक्षिण दिग्विजय दिन-खंडेनवमी (६ ऑक्‍टोबर) व पानिपत शौर्य दिवस (१४ जानेवारी) हे दिवस महासंघातर्फे साजरे केले जाणार आहेत. ऐतिहासिक गढी-किल्ले संवर्धनासाठी, ऐतिहासिक कागदपत्रे, शस्त्रे आदींच्या दस्तावेजीकरणासाठी मार्गदर्शन व साह्य महासंघातर्फे केले जाणार आहे.