
शिरूर : सांगली शहरातील यशवंत नगर येथे राहणाऱ्या ऋतुजा सुकुमार राजगे या सात महिन्याची गरोदर असलेल्या विवाहितेने ख्रिश्चन धर्मांतरणाच्या सातत्यपूर्ण जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याच्या पार्श्वभूमीवर तसेच शिरूर तालुक्यातील वाढत्या धर्मांतराच्या घटनांच्या विरोधात सकल हिंदू समाजाच्या वतीने आज शिरूर शहरात मोर्चा काढण्यात आला.