हिंदू संमेलन
SLC26B28331
सोलापूर : कार्यक्रमात मार्गदर्शन करताना ह.भ.प. सुधाकर महाराज इंगळे.
SLC26B28330
सोलापूर : शोभायात्रेत शिवगीतांवर लेझीमचे सादरीकरण करताना चिमुकल्या रणरागिनी.
.......
हिंदू शब्दाचा अर्थ सोयीनुसार लावू नका
सुधाकर महाराज इंगळे; बाळे येथे हिंदू संमेलनाला प्रतिसाद
सकाळ वृत्तसेवा
सोलापूर ता. ५ : हिंदू शब्दाचा अर्थ स्वतःच्या सोयीनुसार लावू नका, तो समजून घेणे ही काळाची गरज आहे. छत्रपती शिवरायांचा विचार प्रत्येकाच्या मनात पोचवणे हेच खरे हिंदुत्व आहे. ज्यांना आपल्या देशापेक्षा इतर देशांचा अभिमान वाटतो, त्यांनी खुशाल हा देश सोडावा. जे छत्रपतींना मानतात आणि ‘जय श्रीराम’ म्हणतात, त्यांनीच भारतात राहावे, अशा जहाल शब्दांत ह.भ.प. सुधाकर महाराज इंगळे यांनी हिंदू समाजाला जागे केले.
बाळे येथील नागराज नगर येथे शिवशंभू प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित भव्य ‘हिंदू संमेलनात’ ते बोलत होते. महाराज पुढे म्हणाले की, इतर देशांच्या युद्धाचे पडसाद आपल्या देशात उमटतात, हे गंभीर आहे. २५-३० वर्षांपूर्वी हिंदू म्हणणाऱ्याला अपराधी मानले जायचे, मात्र रा.स्व. संघाने घराघरांत हिंदुत्व पोचवले. म्हणूनच ५०० वर्षांनंतर आपल्याला प्रभू श्रीरामांची प्राणप्रतिष्ठा पाहण्याचे भाग्य लाभले. देशाच्या भूगोलात आणि नद्यांच्या नावांतही आपली संस्कृती दडलेली आहे. आता हिंदूंच्या भविष्यासाठी प्रत्येक हिंदू बांधवाने संघटित होणे गरजेचे आहे.
शोभायात्रेने वेधले लक्ष
संमेलनापूर्वी बाळे कॉर्नर येथून भव्य शोभायात्रा काढण्यात आली. जिजाऊ, शिवराय आणि संभाजी महाराजांच्या वेशभूषेतील बाल मावळ्यांनी व लेझीम खेळणाऱ्या मुलींनी उपस्थितांची मने जिंकली. नागरिकांनी ठिकठिकाणी शोभायात्रेचे स्वागत केले. संमेलनात ‘माझ्या राजा रं’, ‘दिशा दिशास भेदूनी’ यांसारखी स्फूर्तीगीते आणि शंभूगाथेच्या सादरीकरणाला हिंदूंनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली.
-----------------------
मान्यवरांची उपस्थिती
कार्यक्रमाची सुरवात वृक्षारोपण व भारतमाता पूजनाने झाली. व्यासपीठावर वर्षा विभूते, बाबासाहेब शेरकर, संतोष धाकपाडे आणि मान्यवर उपस्थित होते. शिरिष मते यांनी आपल्या ओघवत्या वाणीतून सूत्रसंचालन केले. संमेलनानंतर एक हजारांहून अधिक हिंदूंनी महाप्रसादाचा लाभ घेतला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

