
हिंदू राष्ट्र सेनेच्या पदाधिकाऱ्यावर पूर्ववैमनस्यातून ससून रुग्णालयात शिरून गोळीबार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला असल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.
पुणे - हिंदू राष्ट्र सेनेचा पदाधिकारी तुषार हंबीर याच्यावर पूर्ववैमनस्यातून ससून रुग्णालयात शिरून गोळीबार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला असल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी बंडगार्डन पोलिसांनी चौघांना अटक केली आहे. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेले गावठी पिस्तूल, एक जिवंत काडतूस, एक तलवार, एक पालघन असा मुद्देमाल जप्त केला आहे. ही माहिती पोलिस उपायुक्त सागर पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
सागर हनुमंत ओव्हाळ (वय २२, रा. बनकर कॉलनी, शांतिनगर झोपडपट्टी, हडपसर), बालाजी हनुमंत ओव्हाळ (वय २३), सूरज मुक्तार शेख (वय १९, रा. हरपळे चाळ, हडपसर), सागर बाळासाहेब आटोळे (वय २१, रा. वडकी, हडपसर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. या घटनेत हंबीर याच्या संरक्षणासाठी असलेल्या एका पोलिस कर्मचाऱ्याचा हल्ला झाला होता.
तुषार हंबीर हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर खूनासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावर 'मोक्का'नुसार गुन्हा दाखल असून तो येरवडा कारागृहात आहे. आजारी असल्यामुळे त्याच्यावर २५ ऑगस्ट पासून ससून रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान सोमवारी (ता.५) रात्री पावणे दहा वाजण्याच्या सुमारास हंबीर याचे मित्र असल्याचे सांगून पाच जण ससून रुग्णालयात शिरले. त्यांच्यातील एकाने आपल्याकडील पिस्तुलातून हंबीरच्या दिशेने गोळीबार केला.
परंतु, पिस्तुलातून गोळी फायर झाली नाही. यानंतर आरोपी कोयत्याने मारहाण करण्याच्या तयारीत असतानाच तेथे पोलिस बंदोबस्तावर असलेले पोलिस कर्मचाऱ्यांनी हल्लेखोराला रोखण्याचा प्रयत्न केला. झालेल्या झटापटीत पोलिस कर्मचारी जखमी झाले. त्यानंतर हल्लेखोर पसार झाले. पोलिसांकडून आरोपींचा शोध घेण्यात येत होता. त्यावेळी हल्लेखोर हे सिंहगड रोडवरील पानमळा परिसरात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार तपास पथकाने त्यांना ताब्यात घेतले. वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रताप मानकर, पोलिस उपनिरीक्षक राहुल पवार, अंमलदार मोहन काळे, सागर घोरपडे, संजय वणवे, ज्ञाना बढे, मनोज भोकरे, शिवाजी सरक, नितीन जगताप, अमोल सरडे, यांनी केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.