हिंगोलीत पीककर्ज वाटप केवळ १०.०३ टक्के

हिंगोलीत पीककर्ज वाटप केवळ १०.०३ टक्के
Published on

हिंगोलीत पीककर्ज वाटप केवळ १०.०३ टक्के
---
७,११९ शेतकऱ्यांना लाभ

ॲग्रोवन वृत्तसेवा
हिंगोली : खरीप हंगाम सुरू असतानाही हिंगोली जिल्ह्यात पीककर्ज वाटपाची गती संथच आहे. यंदा (२०२६-२७) जिल्ह्यातील विविध बँकांना ९२६ कोटी १३ लाख रुपयांच्या पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले असून, शुक्रवार (ता. १९) अखेर केवळ ९२ कोटी ९३ लाख रुपयांचे कर्ज वितरित झाले आहे. हे एकूण उद्दिष्टाच्या १०.०३ टक्के इतके आहे.

जिल्ह्यातील ७ हजार ११९ शेतकऱ्यांना आतापर्यंत पीककर्जाचा लाभ मिळाला आहे. पीककर्ज वाटपात राष्ट्रीयीकृत बँका आघाडीवर असून, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची कामगिरी अपेक्षेपेक्षा मागे असल्याचे चित्र आहे.

गतवर्षीच्या ८७५ कोटी ९० लाख रुपयांच्या उद्दिष्टात ५० कोटी २३ लाख रुपयांची वाढ करून यंदा १६ बँकांच्या ११२ शाखांना ९२६ कोटी १३ लाख रुपयांचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्यामध्ये राष्ट्रीयीकृत बँकांना ३८५ कोटी ८९ लाख, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला १९८ कोटी १० लाख, महाराष्ट्र ग्रामीण बँकेला २७५ कोटी ६० लाख आणि खासगी बँकांना ६६ कोटी ५४ लाख रुपयांचे उद्दिष्ट देण्यात आले आहे.

शुक्रवारपर्यंत राष्ट्रीयीकृत बँकांनी ३,८३८ शेतकऱ्यांना ५२ कोटी ६५ लाख रुपये, महाराष्ट्र ग्रामीण बँकेने १,७८० शेतकऱ्यांना २२ कोटी २६ लाख रुपये, खासगी बँकांनी १,००९ शेतकऱ्यांना १६ कोटी २८ लाख रुपये, तर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने ६२० शेतकऱ्यांना केवळ ५ कोटी ४५ लाख रुपयांचे पीककर्ज वितरित केले आहे.

भारतीय स्टेट बँकेने सर्वाधिक ३४ कोटी ८० लाख रुपयांचे कर्जवाटप केले असून, शेतकरी संख्येतही ती आघाडीवर आहे. दुसरीकडे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची प्रगती अत्यंत मंद राहिल्याने शेतकऱ्यांकडून नाराजी व्यक्त होत आहे.

बँकनिहाय पीककर्ज वाटप स्थिती (ता. १९ पर्यंत)
बँक उद्दिष्ट (कोटी रु.) वाटप (कोटी रु.) शेतकरी
भारतीय स्टेट बँक २५३.६५ ३४.८० २,५१०
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक १९८.१० ५.४५ ६२०
महाराष्ट्र ग्रामीण बँक २७५.६० २२.२७ १,७८०
बँक ऑफ बडोदा ७.६३ १.६७ १५८
बँक ऑफ इंडिया ४५.९७ १.८६ १३५
बँक ऑफ महाराष्ट्र १७.६९ ४.८९ ३८५
कॅनरा बँक २३.०२ ४.३६ २७५
सेंट्रल बँक ऑफ इंडिया ५.८१ ०.५६ ४५
इंडियन बँक १०.७८ ०.२३ ३०
पंजाब नॅशनल बँक ७.६४ १.१० ६५
युको बँक २.१७ ०.४९ ३७
युनियन बँक ऑफ इंडिया ११.५३ २.६५ २०८
ॲक्सिस बँक ३.८२ ०.९८ ३०
डीसीबी बँक ३.५६ ०.१२ १०
एचडीएफसी बँक २९.०४ ७.२२ ५८०
आयसीआयसीआय बँक २५.७० ५.१५ १२४
आयडीबीआय बँक ४.४२ २.८१ २६५

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com