Hinjawadi News : प्रवाह रोखल्यामुळेच हिंजवडीत पूरस्थिती; ‘पीएमआरडीए’चे निरीक्षण; ‘एमआयडीसी’सह इतर यंत्रणांकडून कारवाई होणार
PMRDA Report : हिंजवडी आणि मेट्रो मार्गावरील अनधिकृत अडथळ्यांमुळे नैसर्गिक जलप्रवाह रोखला गेल्याने पूरस्थिती निर्माण झाल्याचे पीएमआरडीएने स्पष्ट केले असून कारवाई सुरू आहे.
पिंपरी : हिंजवडी फेज - १, २ आणि ३ तसेच मेट्रो मार्गासह परिसरात नियमांचा भंग करून ओढे - नाल्यांचा नैसर्गिक पाण्याचा प्रवाह रोखल्यामुळेच पूर परिस्थिती निर्माण होत आहे, असे निरिक्षण पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) नोंदविले आहे.