
हिंजवडी : उपमुख्यमंत्री तसेच पालकमंत्री अजित पवार यांनी राजीव गांधी आयटी पार्क, हिंजवडी-माणमधील विकासकामांची शनिवारी (ता. २६) सकाळी सहा वाजता पाहणी केली. कामांचा आढावा घेताना त्यांनी अधिकारी, पुढारी, सरपंच, बांधकाम व्यावसायिकांसह ग्रामस्थांनाही खडे बोल सुनावले. विकासकामात अडथळे आणणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचा आदेश त्यांनी दिला.