Pune Metro
sakal
पुणे - हिंजवडी-शिवाजीनगर मार्गावरील मेट्रो अत्याधुनिक थर्ड-रेल विद्युतीकरण प्रणालीवर धावणार आहे. या २३ किलोमीटर लांबीच्या मार्गावर प्रथमच अशा तंत्रज्ञानाचा वापर होणार आहे.
पारंपरिक मेट्रो मार्गावर वरच्या बाजूच्या वायर आणि मास्ट्सवर वीजपुरवठा होतो. मात्र, थर्ड-रेल तंत्रज्ञान मेट्रो मार्गाच्या बाजूला बसवलेल्या अतिरिक्त कंडक्टर रेलद्वारे वीजपुरवठा करते. ट्रेनच्या खाली बसवलेले कलेक्टर शूज थेट या रेल्वे रुळावरून वीज घेतात. त्यामुळे उच्चदाब उपकरणांची गरज नाहीशी होते आणि मेट्रो मार्गाचे दृश्य स्वच्छ दिसते. या प्रकारचे तंत्रज्ञान कोलकाता, बंगळुरू आदी निवडक शहरांत वापरले गेले आहे. त्यात आता पुण्याचा समावेश झाला आहे.