Hinjewadi Metro : हिंजवडी मेट्रोचा प्रवास कागदावरच! सहा मुहूर्त टळले; कामे पूर्ण न झाल्याने तारीख पे तारीख

हिंजवडीच्या वाहतूक कोंडीत तासन्‌तास अडकून आम्ही अक्षरशः वैतागून गेलो आहोत. दररोजचे तीन ते चार तास नुसते या कोंडीतच वाया जातात.
Hinjewadi Metro Project

Hinjewadi Metro Project

sakal

Updated on

- अविनाश ढगे

पुणे/पिंपरी - हिंजवडीच्या वाहतूक कोंडीत तासन्‌तास अडकून आम्ही अक्षरशः वैतागून गेलो आहोत. दररोजचे तीन ते चार तास नुसते या कोंडीतच वाया जातात. प्रशासनाला आमच्या मौल्यवान वेळेची आणि या रोजच्या त्रासाची काहीच किंमत उरलेली नाही का? मेट्रो कधी सुरू होईल आणि आमची या कोंडीतून कधी सुटका होईल, याचा कोणताच नेम नाही. नुसते मुहूर्तच जाहीर करत आहेत, कागदावरील मेट्रो जमिनीवर कधी धावणार, असा संतप्तवजा सवाल आयटीयन्स समीर आणि त्यांच्या मित्रांनी उपस्थित केला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com