
हिंजवडी : भरधाव अवजड डम्परने दुचाकीस्वार तरुणीला धडक देत तीच्या अंगावर वाहन घातले. तीचा डावा पाय चाकाखाली अडकला. या घटनेनंतर चालक पळून गेल्याने तब्बल अर्धा तास तरुणी चाकाखाली विव्हळत पडली होती. वेळेत उपचार मिळू न शकल्याने अति रक्तस्त्राव व सेप्टिक होऊन तीचा डावा पाय डॉक्टरांना कमरेपासून काढावा लागला. ही ह्रदयद्रावक घटना सोमवारी (ता. ३०) दुपारी दोनच्या सुमारास ताथवडे येथील अंडरपास समोर घडली.