हिंजवडी आयटी पार्क चकाचक

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 17 एप्रिल 2018

पिंपरी - हिंजवडी आयटी पार्कमध्ये येणारी विदेशी मंडळी या परिसरातील स्वच्छतेबाबत कायम प्रश्‍न उपस्थित करीत असतात. या पार्श्‍वभूमीवर स्वच्छतेचा विषय कायमस्वरूपी मार्गी लागावा, म्हणून हिंजवडी इंडस्ट्रिअल असोसिएशनने क्‍लीन अँड ग्रीन आयटी पार्क इनिशिएटिव्ह या अनोख्या उपक्रमाची सुरवात केली आहे. 

हिंजवडी आयटी पार्कच्या टप्पा एकमधील रस्ते चकाचक करणे, कंपन्यांमध्ये झाडांची लागवड करून मोठ्या प्रमाणात हिरवाई निर्माण करणे, असे उपक्रम या माध्यमातून करण्यात येणार असल्याचे असोसिएशनचे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर कर्नल (निवृत्त) चरणजितसिंग भोगल यांनी ‘सकाळ’ला सांगितले. 

सुरवातीचे तीन महिने हा उपक्रम टप्पा एकमध्ये राबविण्यात येणार आहे. त्याचे यश पाहून टप्पा दोन आणि तीनमध्ये त्याची व्याप्ती वाढविण्यात येणार आहे. 

गेल्या आठवड्यात या उपक्रमाला सुरवात केली, तेव्हापासून आतापर्यंत टप्पा एकमधील रस्त्यावरून सुमारे ३५ टिपर कचरा उचलण्यात आला आहे. रविवारी हिंजवडी भागात आठवडे बाजार भरतो. त्यामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात भाजीपाल्याचा कचरा साठलेला असतो. सोमवारपासून आयटी कंपन्यांचे काम सुरू होते. त्यामुळे या भागातून जाताना घाणीचे साम्राज्य पसरलेले असते.

बऱ्याचदा परदेशातील मंडळी कामानिमित्त येथील कंपन्यांत येत असतात. त्यामुळे रस्त्यावरचे हे चित्र चांगले दिसत नाही. असोसिएशनने खासगी कंपनीच्या माध्यमातून रस्ते  स्वच्छ ठेवण्याचा उपक्रम हाती  घेतला आहे. याशिवाय रस्त्याच्या मध्यभागी असणाऱ्या दुभाजकांत लावलेल्या झाडांची छाटणी करणे, त्या ठिकाणी जमा झालेला कचरा काढणे ही कामे या उपक्रमाअंतर्गत करण्यात येत असल्याचे भोगल यांनी सांगितले.

कंपन्यांकडून वृक्षारोपण
परिसर हिरवागार राहावा, यासाठी अनेक कंपन्या परिसरात वृक्षारोपण करीत आहेत. कंपनीचे कंपाउंड आणि रस्त्यावरील पदपथादरम्यान असणाऱ्या जागेत एमआयडीसीची परवानगी घेऊन दहा ते १५ कंपन्यांनी झाडे लावली आहेत. आयटी पार्कच्या परिसरातील हिरवाई वाढल्यास पर्यावरण संवर्धनासाठी त्याचा चांगला फायदा होणार असल्याचे चरणजितसिंह भोगल यांनी सांगितले.

Web Title: HInjewadi IT Park Clean