
मुंबई : हिंजवडी आयटी पार्कची समस्या सोडविण्यासाठी मेट्रोचे काम डिसेंबरअखेर पूर्ण करण्यात येईल. तसेच वाहतूक सक्षम करण्यासाठी प्रस्तावित रस्ते आणि संबंधित विकासकामे मार्गी लावण्यासाठी सर्व शासकीय आस्थापनांसाठी ‘सिंगल पॉइंट ॲथॉरिटी’ तयार केली जाईल, तसेच विभागीय आयुक्त दर आठवड्याला आढावा घेतील, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.